RSS Terrorist Recce Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या रडारवर?

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश ए मोहम्मद च्या दहशतवाद्याने त्या परिसरातील काही फोटो पाकिस्तानमधील आपल्या म्होरक्या ला पाठवले. मात्र ते फोटो फार लांबून घेण्यात आले होते, तसेच ते स्पष्ट नव्हते अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे

या कथित दहशतवाद्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयापर्यंत जाण्याचे ही प्रयत्न होते. मात्र, त्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने त्याचा बेत फसल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. या दहशतवादाचे नाव जरी पोलिसांनी स्पष्ट केले नसले तरी त्याच्या विरोधात नागपुरात युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून केंद्रीय तपास यंत्रणा आणि नागपूर पोलीस मिळून तपास करत असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.

आतापर्यंतच्या तपासाप्रमाणे या दहशतवाद्याला नागपुरात कोणीही मदत केली नव्हती असा दावा ही आयुक्तांनी केला आहे  दरम्यान, भविष्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्याचा ताबा नागपूर पोलीस घेईल अशी माहितीही आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola