Old Pension scheme : नागपूर तहसिल कार्यालयात कर्मचाऱ्यांचं संप, तहसिल कार्यालयातून संपाचा थेट आढावा

Continues below advertisement

Old Pension scheme  : नागपूर तहसिल कार्यालयात कर्मचाऱ्यांचं संप, तहसिल कार्यालयातून संपाचा थेट आढावा
मुंबई :
 एकीकडे नागपुरात हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू असून, आजचा सहावा दिवस आहे. तर, दुसरीकडे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या (Old Pension Scheme) मागणीसाठी आजपासून संपाची हाक दिली आहे. त्यामुळे, राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), मुंबई (Mumbai), कोल्हापूर (Kolhapur), नागपूर (Nagpur), नाशिकसह (Nashik) सर्वच जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळीच जोरदार निदर्शने करत संपाची सुरवात केली आहे. 

नाशिक जिल्ह्यात देखील संपाचे पडसाद...

राज्य सरकारी, निम सरकारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचारी यात सहभागी होणार असल्याने राज्यात आरोग्य सेवा देखील विस्कळीत होण्याची भिती व्यक्त केली जाते आहे. एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर, जिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,  स्त्री रुग्णालय, विभागीय संदर्भ रुग्णालयातील परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारत संपात सहभागी झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram