
Nitin Gadkari : नितीन गडकरी धमकी प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याची शक्यता
Continues below advertisement
नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात मोठी बातमी आहे. हे प्रकरण लवकरच केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. आरोपी जयेश पुजारी उर्फ जयेश कांथाच्या चौकशीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण दिसतं त्यापेक्षा अधिक गंभीर आहे, असं सूत्रांनी सांगितलं. जयेशला बेळगावहून ताब्यात घेण्यात आलं होतं. अधिक तपासासाठी नागपूर पोलिसांची एक टीम पुन्हा बेळगावला जाणार आहे.
Continues below advertisement