Nitin Gadkari यांना धमकीचा फोन बेळगाव तुरुंगातून आला? धक्कादायक माहिती समोर ABP Majha

Continues below advertisement

Nitin Gadkari यांना धमकीचा फोन बेळगाव तुरुंगातून आला? धक्कादायक माहिती समोर ABP Majha

गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाला धमकीच्या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे बाईट होत आहे. गडकरी यांना धमकी देणारा सराईत गुन्हेगार फाशीची शिक्षा झालेला गुंड आहे... "जयेश कांथा" असे त्याचे नाव असून त्याने धर्म परिवर्तन केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. आपल्या प्रेयसीच्या प्रभावात त्याने केरळ मध्ये जाऊन काही वर्षांपूर्वी धर्म परिवर्तन केले असल्याची माहिती आहे... त्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्यालयाला देण्यात आलेल्या धमकी प्रकरणाचा तपास पुढे केरळ पर्यंत जाण्याची ही शक्यता आहे. जयेश कांथाकडे जेलमध्ये एक डायरी सापडली असून त्याच्यामध्ये गडकरी यांच्या कार्यालयाचा नंबर होताच. शिवाय इतर अनेक नंबर्स त्याच्यामध्ये असून काही व्हीव्हीआयपीचे नंबर सही असल्याची माहिती आहे. नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला पोहोचले असून आता जयेश कांथा याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram