Nitin Gadkari Exclusive :उत्तर नागपूर मतदारसंघ भाजपासाठी महत्त्वाचा; 30 ते 40 हजारांची आघाडी घेऊ
Nitin Gadkari Exclusive :"उत्तर नागपूर मतदारसंघ भाजपासाठी महत्त्वाचा; 30 ते 40 हजारांची आघाडी घेऊ" उत्तर नागपूर मधून यंदा किमान 30 ते 40 हजारांची आघाडी घेऊ असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एबीपी माझा शी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना केला आहे... नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी फक्त उत्तर नागपूर मध्येच गेल्या वेळेला भाजप पिछाडीवर होतं... तीच पिछाडी भरून काढण्यासाठी यंदा उत्तर नागपूर वर भाजपने खास लक्ष केंद्रित केलं असून आज गडकरी उत्तर नागपूर आतील मैदानात उतरले आहे... मी नागपूरचा असून नागपूर माझं कुटुंब आहे.. मी कधीही जात, धर्म, पंथ असा भेद केला नाही आणि त्यामुळेच नागपूरमध्ये सर्व लोक माझ्यावर प्रेम करतात आणि हीच माझी राजकीय पुंजी असल्याचे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.. उत्तर नागपूर मधील मागील वेळची पिछाडी मोठ्या मताधिक्याने यंदा भरून काढू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला...