Nitesh Rane : दिशा सालियननं सुशांतला पाठवलेल्या फोटोत कोण होतं? नितेश राणे यांचा सवाल

Continues below advertisement

Nitesh Rane On Aaditya Thackeray : अभिनेते सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियान (Disha Salian) यांचे मृत्यू झाले, तेव्हापासून फक्त आदित्य ठाकरे यांचेच नाव का समोर येत आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. इतरांचे नावांची चर्चा का होत नाही हे समजण्याची गरज असल्याचे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. तसेच जशी श्रद्धा प्रकरणी आफताबची नार्कोटेस्ट होते तशी आदित्य ठाकरे यांची एकदा नार्कोटेस्ट करा, पूर्ण सत्य बाहेर येईल असेही ते म्हणाले. विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. रिया चक्रवर्तीला AU नावाच्या व्यक्तीने 44 फोन का केले होते याचाही सत्य बाहेर येण्याची गरज असल्याचेही यावेळी ते म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram