Nana Patole : 'ज्याच्याकडे पैसा जास्त त्याच्याकडे मतदान जास्त', नाना पटोलेंचं वादग्रस्त विधान
नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकर्ता मेळावा पार पडला. या दरम्यान ज्याच्या अंगावर सर्वाधिक केसेस तोच काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता असं विधान राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. यावेळी ज्याच्याकडे पैसा जास्त त्याच्याकडे मतदान जास्त असंही वादग्रस्त विधान नाना पटोलेंनी केलं आहे.