Nagpur ZP Panchayat Samiti By-election : नागपुरात काँग्रेसला यश, भाजपची पिछेहाट ABP Majha

Continues below advertisement

Nagpur ZP Panchayat Samiti By-election : नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूकीच्या 16 जागांचे निकाल हाती आले आहेत. हाती आलेल्या निकालांनुसार, भाजप 3, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 9, शेकाप 1, गोंडवाना गणतंत्र पार्टीचा एका जागेवर विजय झाला आहे. तर शिवसेना आणि इतर एकही जागा मिळालेली नाही. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघासाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघासाठी काल (मंगळवारी) पोटनिवडणूक झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागांत विखुरलेल्या 1 हजार 115 मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदारांनी आपला कौल दिला.

नागपुरात काँग्रेसच्या मागच्या तुलनेत दोन जागा वाढल्या आहेत. काँग्रेस 7 वरून 9 वर गेली आहे. भाजपनं एक जागा गमावली असून भाजप 4 वरून 3 वर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन जागा गमावल्या असून राष्ट्रवादी 4  वरून 2 वर आली आहे, तर शेकापनं आपली 1 जागा कायम राखली आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीनं 1 जागा जिंकत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे. तर शिवसेना 11 मतदारसंघात निवडणूक लढवूनही एकही जागा जिंकू शकली नाही.  

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूकीच्या 16 जागांचे निकाल हाती आले असून या निकालांनुसार, नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेस पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. काँग्रेसच्या एकूण 31 जागा होत्या, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं त्यातल्या 7 जागा रद्द केल्या होत्या. परंतु, निवडणुकीत 9 जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकूण 33 जागांवर विजय मिळाला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram