Nagpur | शरीर संबंध ठेवताना गळफास लागून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू, गर्लफ्रेण्डला बेड्या
नागपूर : नागपुरात हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना गळफास लागून तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. तरुणाच्या मृत्यूच्या वेळी रुममध्ये असणाऱ्या प्रेयसीला आरोपी बनवत तिला अटक करण्यात आली आहे. तरुणाच्या वडिलांनी मुलाची हत्या झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.