नागपुरात अवघ्या 8 तासांत दोघांचा खून;लॉकडाऊनमध्ये ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त असतानाही गुन्हेगारीत वाढ
Continues below advertisement
नागपूर : हाणामारी, चोरी, लूट, खून, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांसाठी राज्यात नेहमीच चर्चेत असणाऱ्या उपराजधानी नागपुरात अवघ्या आठ तासात दोघांचा खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर गेल्या पंधरा दिवसात सहा जणांच्या हत्या झाल्या आहेत. महत्वाचं म्हणजे लॉकडाऊनमध्ये पावलोपावली पोलीस बंदोबस्त असताना ही शहरात गुन्हेगारी बोकाळली आहे. पोलीस बंदोबस्तावर असतानाही गेल्या दोन-तीन दिवसात खुनाच्या घटना वाढल्याने नागपूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपुरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे.
Continues below advertisement