Nagpur Winter Session :उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, अधिवेशनादरम्यान कडेकोट बंदोबस्त

Continues below advertisement

Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशन काळात 11 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात 

उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे...  आज विधिमंडळाचे अधिवेशनाच्या परंपरेनुसार संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास सत्ता पक्षाकडून चहापानाचा कार्यक्रम होईल... तर चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी होईल... विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात कधी नव्हे एवढा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. अधिवेशन काळात नागपुरातील रस्त्यांवर तब्बल अकरा हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात यापूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांची तैनाती झालेली नाही हे विशेष. पोलीस अधिकारी या विषयावर जास्त बोलायला तयार नाही, मात्र राज्यात सुरु असलेल्या आरक्षणसंबंधी विविध आंदोलने आणि नक्षलवाद्यांच्या कारवायांमध्ये झालेली वाढ हे लक्षात घेता एवढी प्रचंड सुरक्षा व्यवस्था लावण्यात आल्याचं समजतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram