Winter Assembly Session : हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस, विधिमंडळासमोर मुख्यमंत्र्यांचं पोस्टर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWinter Assembly Session : हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस, विधिमंडळासमोर मुख्यमंत्र्यांचं पोस्टर हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या समोर लावण्यात आलेलं एक पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलाय...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंं भव्य पोस्टर विधिमंडळासमोर लावण्यात आलंय. मागील वर्षी याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे २ वेगळे पोस्टर्स लावण्यात आले होते... यंदा मात्र मुख्यमंत्री शिंदेंचं एकच पोस्टर लावण्यात आलंय...
. Maharashtra Assembly Winter Session 2023: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) आजपासून नागपुरातून (Nagpur) सुरुवात होणार आहे. आजपासून पुढचे 10 दिवस महाराष्ट्राची (Maharashtra News) उपराजधानी नागपुरातलं वातावरण तापणार आहे. पुढचे 10 दिवस नागपूर राजकीय घडामोडींचं केंद्र असेल. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप या सर्व विषयांवर अधिवेशनात (Winter Assembly Session 2023) चर्चा होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करतं का? आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काही निर्णय घेतं का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.