Nagpur Ram Mandir : एक एक धागा श्रीरामासाठी, विणकर समाज भगवा कापड अयोध्येला पाठवणार
नागपूरच्या विणकर समाजाने "एक एक धागा श्रीरामासाठी" हा उपक्रम हाती घेतला.. आतापर्यंत साडेतीन हजार नागपूरकरांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी सहभाग नोंदविला आहे. येथे तयार झालेला भगवा कापड हा नागपूर आणि अयोध्येतील मंदिरात प्रभू रामासाठी पाठवण्यात येणार आहे. विणकर समाजाच्या या उपक्रमाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.