Nagpur Tree Issue : जी-20 परिषदेमुळे नागपूर शहरात हजारो झाडं जखमी
Nagpur : जी-20 परिषद संपवून परदेशी पाहुणे त्यांच्या मायदेशी जाण्यास रवाना झाले आणि नागपुरातील अनेक रस्त्यांवरील लाइट्सचा झगमगाटही दिसेनासा झाला. कारण झाडांवर लावलेले लाईट्स काढण्यास प्रशासनानं सुुरुवात केलीये. मात्र धक्कादायक म्हणजे हे लाईट्स लावण्य़ासाठी जे लाखो खिळे ठोकण्यात आले होते, ते काढण्याची तसदी कंत्राटदार घेत नाहीये. सुशोभीकरणामुळे जखमी झालेली ही झाडं भविष्यातही जखमीच राहण्याची भीती आहे. आणि म्हणूनच, नागपूर महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन कंत्राटदारांकडून लाईट्स काढून घेताना खिळेही काढून घेण्याची गरज आहे.