Nagpur T 20 :नागपुरातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 चेंडू -6 विकेट्स राखत पराभव

Continues below advertisement

नागपुरातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ चेंडू आणि ६ विकेट्स राखत पराभव केलाय. कर्णधार रोहित शर्माच्या २० चेंडूतील नाबाद ४६ धावांच्या खेळीने विजय साकारत भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधलीय. रोहित शर्माने ४ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. पावसामुळे प्रत्येकी ८ षटकांचा सामना खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने ८ षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात ९० धावा केल्या.   मॅथ्यू वेडने २० चेंडूत ४३ धावांची वेगवान खेळी केली. फिरकीपटू अक्षर पटेलने २ फलंदाजांना तंबूत पाठवलं. जसप्रीत बुमराने १ विकेट घेतली. मालिकेतला निर्णायक सामना रविवारी हैदराबादमध्ये खेळवला जाईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram