Nagpur Tiffin Meeting : नागपूर विधानसभा मतदारसंघात खास डबा बैठक आयोजित : ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Jun 2023 09:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये संघटनेच्या बांधणीसाठी वर्षानुवर्षे डबा बैठक घेतली जाते... संघ परिवाराचा भाग असलेल्या भाजपमध्येही संघटन बांधणी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी डबा बैठकीचे आयोजन केले जाते... आणि आज नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात खास डबा बैठक आयोजित करण्यात आली आहे..
डबा बैठकीमध्ये येणारे सर्व कार्यकर्ते आपापल्या घरातूनच जेवणाचा डबा घेऊन येतात... आणि एकत्रित बसून जेवतात... डबा बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे..आपल्या नेत्यासोबत अशा मोकळ्या वातावरणात बसण्याची, बोलण्याची संधी या बैठकीमुळे मिळाल्याची भावना तरुण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे...