Nagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारत

Continues below advertisement

Nagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारत
हेही वाचा 

आपल्याविरुद्ध (धनंजय मुंडे) लढण्यासाठी इच्छुकांची मोठी रांग होती, पण (राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून) तुतारीचा उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असल्यानं, आपणच त्यांच्या एका नेत्याला फोन करुन लवकर उमेदवार फायनल करायला सांगितलं, असं वक्तव्य अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर एकच चर्चा रंगली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच राज्याचं लक्ष लागलेल्या परळी मतदार संघात धनंजय मुंडे यांची प्रचार सभा पार पडली. घाटनांदूर येथील सभेत भाषणादरम्यान धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं. माझ्या विरोधात तुतारीकडून लढण्यासाठी एवढे जण तयार झाले, त्यात काही तुतारीचे निष्ठावंत होते आणि ते मतदारसंघात फिरायला लागले. त्यांच्या नेत्याला विचारून मला भिडायला लागले. त्यांचे नेते येईल त्यांना म्हणायचे कामाला लागा, असं बारा-तेरा जणांसोबत झाल्यावर मलाच यांची काळजी वाटली, कारण तसं पाहिलं तर तिकीट तर, यातल्या एकालाच मिळणार म्हणून तुतारीच्या एका नेत्याला फोन लावला. त्यांना सांगितलं, लवकर तिकीट फायनल करा. तिकीट मिळालं नाही ते येडे झाले आणि कागद वेचत फिरायला लागले, पण मी इथला लोकप्रतिनिधी आहे, म्हणून त्यांची काळजी वाटली.", असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram