Nagpur Sitaburdi Waterlogging : सीताबर्डी परिसरातली घरं, दुकानांमध्ये पाणी, लाखो रुपयांचं नुकसान

Nagpur Sitaburdi Waterlogging : सीताबर्डी परिसरातली घरं, दुकानांमध्ये पाणी, लाखो रुपयांचं नुकसान

नागपूर शहरात आज पहाटेपासून पूरसदृश परिस्थिती आहे. कारण पहाटे २ पासून शहरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. ४ तासांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे नाग नदीचं पाणी अनेक भागांत शिरलं. सीताबर्डी मार्केट, मोर भवन, अंबाझरी, आरबीआय क्वार्टर, गांधीनगर, कॉर्पोरेट कॉलनी, वेलकम सोसायटी, दागा ले-आऊट आणि अन्य कागी भागांमध्ये पाणी साचलंय. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं, तसंच शेकडो वाहनं देखील पाण्याखाली गेली होती. सीताबर्डी मार्केटमधील काही व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola