Nagpur : नागपूरची श्रेया रोकडे अपघातात मृत्यूमुखी, हिट अण्ड रन भोगलंय , ते नव्या कायद्याच्या बाजूनं

Continues below advertisement

Nagpur : नागपूरची श्रेया रोकडे अपघातात मृत्यूमुखी, हिट अण्ड रन भोगलंय , ते नव्या कायद्याच्या बाजूनं

हिट एन्ड रन संदर्भात केंद्र सरकारने केलेल्या कायद्याचा वाहतूकदार आणि ट्रक व टॅक्सी चालक कडाडून विरोध करत आहे... मात्र, हिट अँड रन प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना अशा प्रकरणासंदर्भात देशात कठोर कायदा असला पाहिजे असं वाटतंय.. नागपुरातील अठरा वर्षीय श्रेया रोकडेला २८ डिसेंबर रोजी अशोक चौकावर एक मिनी बसने पाठीमागून धडक मारून मृत्यूच्या दारात ढकलले होते... बेदरकारपणे धावणाऱ्या मिनीबस मुळे श्रेयाचा जागीच मृत्यू झाला होता.. तर तिची मोठी बहीण आणि इतर अनेक वाहन चालक जखमी झाले होते.. श्रेयाला मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या आरोपी वाहन चालकाने तिला रुग्णालयातही नेले नव्हते..  श्रेयाची जखमी बहीण आणि इतर नागरिकांनी श्रेयाला रुग्णालयात नेले होते... मात्र, घटनेच्या अनेक तासानंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या आरोपी वाहन चालकाने मात्र त्यानेच घटनास्थळी श्रेया आणि इतर जखमींना कशी मदत केली असे खोटे दावे केले होते... आणि कमकुवत कायद्याचा फायदा घेत अवघ्या काही तासात त्याची जामिनावर सुटका ही झाली होती. त्यामुळे श्रेयाच्या कुटुंबीयांनी हिट अँड रनविरोधाक कठोर कायद्याचं समर्थन केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram