Nagpur | उद्धव आणि आदित्य ठाकरेंबाबत आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या समित ठक्करला आज कोर्टात हजर करणार

पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करला काल राजकोटमधून अटक केली आहे. आज त्याला नागपूर कोर्टात हजर करणार आहेत. अमृता फडणवीसांसहीत अनेकांनी त्याची पाठराखण केली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी त्याला ट्विटरवर फॉलो करतात

सोशल मीडियाच्या माध्यमातून खासकरून ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर खाजगी टीका करणाऱ्या समित ठक्करला नागपूर पोलिसांनी गुजरातमधील राजकोटमधून अटक केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola