Nagpur : विमानाप्रमाणे खासगी बसेसमध्येही सुरक्षिततेच्या सूचना दिल्या जाणार
नागपुरात आता खाजगी ट्रॅव्हल्स मध्येही विमानासारखीच सूचना दिली जाणार आहे!! विमानात आपात्कालीन परिस्थितीत काय करावं याची सूचना एअर होस्टेस कडून दिली जाते... तीच पद्धत आता खाजगी बस मध्ये ही बंधनकारक करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे.. खाजगी ट्रॅव्हल्स बस मध्ये प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता परिवहन विभागाने नुकतच काही निर्णय घेतले असून त्यानुसार आता बसच्या दर्शनी भागात बस चालकाचा फोटो, मोबाईल क्रमांक, बस कंपनीचा दूरध्वनी क्रमांक, बसच्या फिटनेस संदर्भातली माहिती स्टिकर स्वरूपात लावणे बंधनकारक राहणार आहे.