Nagpur : विजेचे खांब न हटवताच पूर्ण केला रस्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाची हुशारी

Continues below advertisement

सार्वजनिक बांधकाम विभागानं नागपूर जिल्ह्यात एक चमत्कार करून दाखवला आहे. रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब न काढताच सिमेंटचा रस्ता बांधण्यात आला आहे. नागपूरच्या टाकळी ते गोधनी मार्गावर तीन कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात आला. मात्र विजेचे खांब रस्त्याच्या कडेला हलवण्याचे कष्ट सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतले नाहीत. यामुळे वाहन चालकांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय, तर पादचाऱ्यांना विजेचा शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता रस्ता पूर्ण झाल्यावर हे खांब काढावे लागणार आहेत, ज्यामुळे नव्या रस्त्याची दुरुस्ती करावी लागेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram