Nagpur : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन; पावसामुळे मांडव कोसळला, आंदोलकांची धावाधाव
पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरासंदर्भात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे आज नागपूरच्या संविधान चौक आवरून आंदोलन पुकारलं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि सर्व काँग्रेस आमदार यांच्या नेतृत्वात संविधान चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय अशी सायकल रॅली काढली जाणार होती. मात्र आंदोलन सुरु होण्याच्या पूर्वी जोरदार पाऊस सुरु होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आंदोलनस्थळी उभे राहून काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पावसाचा जोर वाढला आणि मांडव कोसळला.