Nagpur Rain : नागपुरात ऐन उन्हाळ्यात पावसाळा सदृश्य परिस्थिती
Nagpur Rain : नागपुरात ऐन उन्हाळ्यात पावसाळा सदृश्य परिस्थिती नागपुरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे... काल रात्री जोरदार मेघगर्जनेसह नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता.. त्यानंतर सकाळपासून सूर्यदर्शन झालेले नाही आणि अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत... हवामान विभागाने आज नागपूर सह गोंदिया, अमरावती, अकोला व बुलढाणा या पाच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला आहे... तर गडचिरोली चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि भंडारा या सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे... गेले दोन दिवस विदर्भातील वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडतो आहे.. त्यामुळे उन्हाळी पिकांचा नुकसान होत आहे... मात्र अवकाळी पावसामुळे तापमानात घसरण होऊन एप्रिल महिन्यात दिसून येणारा कडक वैदर्भीय उन्हाळा सध्या तरी दिसून येत नाही...