Nagpur Rain Alert : नागपूर विभागात उद्यापासून 19 मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच पावसाची शक्यता

Continues below advertisement

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार  नागपूर विभागात उद्यापासून 19 मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  16 व 17 मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्हयात अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गारपीट आणि वादळी पावसामुळे मनुष्य आणि वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी  सतर्क राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram