Nagpur Juvenile : नागपूर अल्पवयीन गुन्हेगारांचं कॅपिटल? वर्षभरात 467 अल्पवयीन गुन्हेगार गजाआड
Continues below advertisement
कधीकाळी सराईत गँगस्टर्समुळे क्राईम कॅपिटल म्हणून ओळखली जाणारे नागपूर आता अल्पवयीन गुन्हेगारांचे कॅपिटल बनले आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे.. कारण गेले 16 महिने रोज एक गंभीर गुन्हा अल्पवयीन आरोपी करत असल्याचे समोर आले आहे... नागपूर पोलिसांनी 1 जानेवारी 2022 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, दुखापत, चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तब्बल 467 अल्पवयीन गुन्हेगारांना पकडले आहे.. म्हणजेच सरासरी, रोज एक अल्पवयीन गुन्हेगार गंभीर गुन्हा करतोय. गुन्हेगारी जगतात अल्पवयीन गुन्हेगारांची ही सक्रियता पाहून पोलिसही आश्चर्यचकित झालेत. यातील एक समस्या अशी की या अल्पवयीन गुन्हेगारांविरोधात कठोर पाऊलंही उचलता येत नाहीत. तर दुसरीकडे हे
अल्पवयीन गुन्हेगार पुन्हा पुन्हा गुन्हे करून शहराची कायदा-सुव्यवस्था बिघडवत आहेत.
Continues below advertisement