Nitin Raut | राज्यातील विजेचे दर वाढण्याची शक्यता : ऊर्जामंत्री नितीन राऊत
विजेचे दर वाढण्याची शक्यता कारण केंद्राचे पॅकेज हे 'मुंगेरीलाल के हसीन सपने!' व्याजावर पैसा देणार असं दिसतंय, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. तसेच सध्या अॅव्हरेज बिलिंगमुळे महाराष्ट्रात स्टाफचे पगार करणे कठीण झाले आहे, असंही ते म्हणाले.