Nagpur Crime | एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीसह भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

Continues below advertisement
Nagpur Crime | एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीसह भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

एकतर्फी प्रेम किती घातक वळणावर जाऊ शकते आणि वेळीच मुलींना होणाऱ्या त्रासाची पोलिसांकडे तक्रार केली नाही, तर किती भयावह परिणाम होऊ शकतात याची प्रचिती काल नागपुरात आली आहे. एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कथित प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

काल दुपारी दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी एक्टिव्हाने मानकापूर परिसरात गेला. तिथे रात्री 9 वाजून 26 मिनिटांनी जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन आत्महत्या केली. केरळ एक्स्प्रेसच्या ड्रायवरने रेल्वे एकाने रेल्वे समोर आत्महत्या केल्याची कंट्रोल रूमला माहिती दिली.रेल्वे कंट्रोल रूम ने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीने आत्महत्या केल्याची स्पष्ट झाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram