Tukaram Mundhe | नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह

Continues below advertisement

 नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तसंच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली. 
"माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, पण नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी विनंती करतो की, मागील 14 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी. नागपूरमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मी घरातूनच काम करत आहे. आपण नक्कीच जिंकू," असं तुकाराम मुंढे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram