Nagpur Mumbai Railway सेवा हळूहळू पूर्वपदावर, मूर्तिजापुरातील मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका

 अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर परिसरात काल संध्याकाळी धुव्वाधार पाऊस झाला. पावसामुळे माना-कुरूम गावाजवळ रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेला होता. यामुळे मुंबई आणि नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक काल संध्याकाळी ६ वाजल्यापासून पूर्णपणे थांबली होती. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काहींचे मार्ग बदलण्यात आले होते. आज पहाटेपासून  मुंबई - हाव़डा रेल्वेमार्गावरील दोन्ही अप आणि डाऊनची रेल्वे वाहतूक सुरु झालीय.  रेल्वे प्रशासनाकडून रात्रभर रेल्वे रुळाच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. आता मुंबईकडून नागपूरला जाणारी वाहतूकही पूर्ववत कऱण्यात आली आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola