Nagpur : MPSC पूर्वपरीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप, परीक्षा केंद्रासमोर ABVP कार्यकर्त्यांचं आंदोलन

नागपुरात एमपीएससी पूर्वपरीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप अभाविपने  केलाय. नागपुरातील एका परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याआधीच प्रश्नसंचाचं सील फोडण्यात आलं असा आरोप अभाविपने केलाय. प्रश्नसंचाचं सील काढल्याचा एक फोटो परीक्षार्थीनं घेतल्याचा दावा करण्यात येतोय. हा फोटो आजचा आहे का याबाबत एबीपी माझा पुष्टी करत नाही. मात्र अशास्थितीत प्रश्नसंच फुटल्याचा दावा काही परीक्षार्थींनी केलाय. अभाविपचे कार्यकर्ते परीक्षा केंद्रावर पोहोचले. यावेळी परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप होतोय. परीक्षा केंद्रप्रमुख आणि एका लिपिकाने सील फुटल्याची कबुली दिल्याचा दावा अभाविपने केलाय. तर पेपर सुरु होईपर्यंत प्रश्नसंच सील होता असा दावा पोलिसांनी केलाय.,. या ठिकाणी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या मार्गाने सोडल्यानंतरही अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी पोलिसांनी अभाविप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola