Nagpur Metro | नागपूर मेट्रोकडून नवी जाहिरात प्रकाशित, पालकमंत्री, गृहमंत्र्यांच्या फोटोंचा समावेश | ABP Majha

नागपूर मेट्रोच्या उद्घाटनाच्या जाहिरातीत पालकमंत्री आणि गृहमंत्र्यांचे फोटो नसल्याची खंत काल नितीन राऊत यांनी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत आज नागपूर मेट्रोसंदर्भात नवीन जाहिरात स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीत पालकमंत्री आणि गृहमंत्री अनिल देशमुखांचे फोटो छापण्यात आलेत. काल पानभर जाहिरातीत आपले फोटो नसल्याची खंत उद्घाटनाच्या कार्यक्रमातल्या भाषणात नितीन राऊतांनी बोलून दाखवली होती. मात्र, या नाराजीनाट्यानंतर आज नवीन जाहिरात पेपरमधे छापण्यात आली आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola