Nagpur Rape : नागपूरमध्ये गतिमंद मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा बलात्कार, चौघांना अटक, दोन फरार

नागपूर : क्राईम कॅपिटल होत असलेल्या नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. घरातून निघून गेलेल्या अल्पवीय मुलीला एका ऑटो चालकाने मदत करण्याच्या बहाण्याने रुमवर नेत आपल्या मित्रांसोबत सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटे मोमीनपुरा जवळ मेयो रुग्णालयाच्या समोर पीडित मुलीला सोडून नराधमांनी पोबारा केला. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले असून दोघेजण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

या संदर्भात सविस्तर वृत्त असे, की शहरातील एक मुलगी गुरुवारी रात्री घरातून निघून जाऊन रेल्वे स्टेशन जवळच्या मानस चौकात आली होती. तिला नाशिकच्या दिशेने जायचे होते. मानस चौकात लोखंडी पुलाजबळ तिला एका ऑटो चालकाने मदत करतो असे खोटे सांगून आपल्या मोमीनपुरा परिसरातल्या रूमवर नेले आणि तिथे आपल्या इतर ऑटो चालक मित्र आणि रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करणाऱ्या मित्रांना बोलावले. त्या रूममध्ये चौघांनी तिच्यावर रात्री आळीपाळीने बलात्कार केला. नंतर शुक्रवारी पहाटे मोमीनपुरा जवळ मेयो रुग्णालयाच्या समोर सोडून दिले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola