Nagpur Medical College Ragging : नागपुरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग प्रकरणी विद्यार्थ्यांवर कारवाई
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Medical College Ragging : नागपुरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रॅरिंग प्रकरणी विद्यार्थ्यांवर कारवाई
नागपूरच्या शासकीय वैदकिया रुग्णालय आणि महाविद्यालय म्हणजेच मेडिकलमध्ये ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्या प्रकरणी सहा सिनियर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.. रॅगिंग झालेला ज्युनियर विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्षाचा आहे. तर रॅगिंग केल्याचा आरोप असलेले सहा विद्यार्थी एमबीबीएस नंतर इंटर्नशीप करणारे आहेत. काही दिवसांपूर्वी रॅगिंग चे प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने त्याची तक्रार आणि काही पुरावे सेन्ट्रल रॅगिंग समिती कडे पाठविले होते... सेंट्रल रॅगिंग कमिटी कडून महाविद्यालय प्रशासनाकडे पाठपुरावा झाल्यानंतर रॅगिंग चा आरोप असलेल्या सहा विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशिप’ रद्द करण्यात आली आहे.