Nagpur Medical College Ragging Case : वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग, 6 विद्यार्थ्यांवर कारवाई
Continues below advertisement
Nagpur Medical College Ragging Case : वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग, 6 विद्यार्थ्यांवर कारवाई
नागपूरच्या शासकीय वैदकिया रुग्णालय आणि महाविद्यालयात ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याप्रकरणी अखेर कारवाई झालेय. रॅगिंग करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्याचा निर्णय महाविद्यालयानं घेतलाय. रॅगिंग झालेला विद्यार्थी हा एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. तर रॅगिंग करणारे सहा विद्यार्थी इंटर्नशिप करणारे आहेत. घटना घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने त्याची तक्रार आणि काही पुरावे सेन्ट्रल रॅगिंग समिती कडे पाठविले होते. सेंट्रल रॅगिंग कमिटी कडून महाविद्यालय प्रशासनाकडे पाठपुरावा झाल्यानंतर रॅगिंग चा आरोप असलेल्या सहा विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशिप’ रद्द करण्यात आली आहे.
Continues below advertisement