Nagpur Marbat Festival : नागपुरात मारबत उत्सवाला भर पावसात सुरुवात
नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाचं प्रतीक असलेल्या मारबत उत्सवाला भर पावसात सुरुवात झाली आहे. जागनाथ बुधवारी परिसरातून तेली समाजाकडून काढली जाणारी पिवळी मारबत मार्गस्थ झाली आहे., थोड्या वेळानंतर नेहरू पुतळ्याजवळ पिवळी आणि काळी मारबत एकत्र येतील आणि तिथे दोघांची भेट होऊन पुढे एकत्रित मिरवणूक निघेल.