Nagpur Makar Sankranti : संक्रांतीच्या मुहूर्तावर नागपूरकरांनी घेतला पतंगबाजीचा आनंद ABP Majha

Nagpur Makar Sankranti : संक्रांतीच्या मुहूर्तावर नागपूरकरांनी घेतला पतंगबाजीचा आनंद ABP Majha

मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज नागपुरात पतंगोत्सव उत्साहाने साजरा होत आहे.. नागपूर शहरातील प्रत्येक भागात, मोठ्या इमारतींच्या गच्चीवर सर्व रहिवाशी एकत्रितपणे पतंगबाजीचा आनंद लुटत आहेत... मकर संक्रांतीच्या निमित्ताने जानेवारी महिन्यात नागपुरात मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते... मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष लोकांच्या सामूहिक पतंगबाजीवर काही निर्बंध होते.. मात्र, यंदा मोकळ्या वातावरणात उत्साहाने संक्रांत आणि पतंगोत्सव साजरा होत आहे. खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांची पतंग कापल्यानंतर "ओ काट" चा आवाज सर्वत्र घुमत आहे... लहान मुलांसह मोठे ही पतंगबाजी मध्ये रमले असून लहानपणाच्या आठवणी ताज्या होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola