Nagpur Journalist Reaction On Lok Sabha Election : नागपुरात कोणाचं पारडं जड? पत्रकारांचा अंदाज काय?

Continues below advertisement

Nagpur Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उपराजधानी नागपूरात (Nagpur) फक्त 54 टक्के मतदान झालं, म्हणजेच 46 टक्के नागपुरकरांनी आपले मतदानाचं कर्तव्य बजावलच नाही. हे ऐकून नागपूरकर किती बेजबाबदार आहेत, असंच कोणालाही वाटेल. मात्र नागपूरात कमी मतदानामागे मतदारांची अनास्था हेच एकमेव कारण नव्हते, तर मतदारयाद्यांमधील प्रचंड घोळ, राजकीय पक्षांचं दुर्लक्ष आणि प्रशासनाची (Election Commission Voter List) घोडचूक इत्यादि अनेक कारणं देखील कारणीभूत असल्याचं आता समोर येऊ लागले आहे. 

मात्र,  असे असले तरी ही आकडेवारी लक्षात घेतली तर एकट्या नागपूर लोकसभा मतदारसंघात (Nagpur Lok Sabha Election 2024) तब्बल 10 लाख 15 हजार 937 मतदारांनी मतदान केलेले नाही. त्यामुळे ज्यांनी मतदानकेंद्रा पर्यंत जाण्याची तसदीही घेतली नाही, तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात कसूर केला, अशाच्या निषेधाचे होर्डिंग सद्या नागपूर शहरात लागले आहेत. नागपूरच्या ट्राफिक पार्क चौकात लागलेल्या या होर्डिंग वर 'शेम ऑन यू' असा उल्लेख करण्यात आलाय. सध्या हे बॅनर सऱ्यांचे लक्ष वेधत असून चर्चेचे विषय ठरले आहे. 

उपराजधानीत अवघे 54 टक्के मतदान

अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. पूर्व विदर्भातील पाच मतदासंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता निकालानंतर ठरणार आहे. या पाचही मतदासंघातील एकूण 97 उमेदवार रिंगनाणात होते. तर या साऱ्यांना आता 4 जून म्हणजेच तब्बल 45 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर दुसरकडे उपराजधानीत (Nagpur) मतदानात झालेली घट ही एक चिंतेचे बाब मानली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि सर्व स्थरातील यंत्रणा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक कसोशीचे प्रयत्न केलेत. त्यात अगदी विक्रमी उपक्रमही घेतले.

मात्र, 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. अशातच मतदानाच्या टक्केवारीत झालेली घसरण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने निवडणूक कामातील हलगर्जीपणा करणाऱ्या बीएलओंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मतदार यादीतील मोठ्याप्रमाण झालेला घोळ लक्षात घेता दोषींवर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. तर दुसरीकडे नागपूर शहरातील काही जागृत मतदारांनी थेट बॅनर मधून मतदान न करणाऱ्यांवर टीका केलीय. 

मतदारांनी झळकवले निषेधाचे होर्डिंग 

नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 22,23,281 मतदार आहे. त्यापैकी प्रत्यक्षात 12,07,344 मतदान केले. तर उर्वरित 10 लाख 15 हजार 937 मतदारांनी मतदान केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारण नसतानाही मतदान न करणाऱ्या जागृत नागपूरकर मतदारांनी निषेधाचे होर्डिंग झळकत त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram