Nagpur Hording Structural Audit : नागपुरातील सर्व होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट 15 दिवसांत होणार !
Nagpur Hording Structural Audit : नागपुरातील सर्व होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट 15 दिवसांत होणार ! मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून दुर्दैवी घटना घडली आणि राज्यभरात मोठ्या होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे... त्यातच नागपुरात महापालिकेने रेल्वेवर गंभीर आरोप करत रेल्वेने स्वतःच्या जमिनीवर 200 होर्डिंग विनापरवानगी उभारल्याचा दावा केला आहे... महापालिकेचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नागपुरात रेल्वेच्या विविध जमिनीवर 200 होर्डिंग उभे असून त्यासाठी रेल्वेने कुठलीही परवानगी घेतलेली नाही.. वारंवार पत्र देऊनही रेल्वे कडून त्या संदर्भात कुठलेही उत्तर दिले जात नाही असे मेश्राम म्हणाले....