Nagpur Accident Case : सासऱ्याची हत्या घडवणाऱ्या अर्चना पुट्टेवारचा धक्कादायक दावा
संपत्तीसाठी सासर्यांच्या अपघाताचा बनाव करुन हत्या घडवणाऱ्या अर्चना पुट्टेवारने चौकशीदरम्यान धक्कादायक दावा केला आहे. सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार जादूटोण्याचा वापर करायते, असा संशय त्यांनी व्यक्त केला. आपल्या कुटुंबात काही जणांचा अकाली मृत्यू झाल्याचं अर्चना पुट्टेवार यांनी पोलीस चौकशीत सांगितल्याची माहिती आहे.
२२ मे रोजी नागपुरातल्या ८२ वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघात झाला होता.. चारचाकी गाडीनं दिलेल्या धडकेत पुट्टेवार यांचा मृत्यू झाला.. सुरुवातीला पोलिसांनी या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद केली होती.. मात्र काही दिवसांनी पोलिसांना पुट्टेवार यांच्या नातेवाईकांकडून गोपनीय माहिती मिळाली.. आणि त्यानंतर हा संपूर्ण कट उघडकीस आला..
पुट्टेवार यांना मारण्याचा कट त्यांचीच सून अर्चना पुट्टेवार यांनी रचला.. यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबातला ड्रायव्हर सार्थक बागडे याला काही लाखांची सुपारी दिली.. सार्थक बागडे यानं हे काम नीरज नीमजे आणि सचिन धार्मिक यांच्याकडे सोपवलं.. २२ मे रोजी नागपुरातल्या बालाजी नगर परिसरात पुट्टेवार यांना चारचाकी गाडीनं धडक दिली.. या गाडीत नीरज नीमजे आणि सचिन धार्मिक हे दोघेही उपस्थित होते..
२२ कोटी रुपयांच्या संपत्तीतला वाटा पुरुषोत्तम पुट्टेवार यांनी आपल्या मुलीला देऊ नये यासाठी अर्चना पुट्टेवार यांनी हा कट रचला.. ८ मे आणि १६ मे रोजीही पुट्टेवार यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता..