Nagpur Accident News : फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलं; दोघांचा मृत्यू

Nagpur Accident News नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरणाचे सत्र सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामागील कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी एक भरधाव कारने रस्त्याच्या कडेला असलेले अनेक वाहने उडवत ही कार थेट दुकानात शिरल्याची घटना घडली होती. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असताना आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. यात फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा (Nagpur Accident) धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे. ही घटना रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी कारचालकाला अटक केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola