नागपूर आणि विदर्भाला रेमडेसिवीर, ऑक्सिजन असमतोल वाटपावरुन उच्च न्यायालयाचे 'हे' महत्त्वाचे आदेश

Continues below advertisement

नागपूर : नागपूर आणि विदर्भाला रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा असमान वाटप होत असल्याच्या सुमोटो याचिकेवर बुधवारी (21 एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चक्क रात्री सुनावणी घेतली. रात्री 8 वाजता सुरु झालेली सुनावणी ही रात्री जवळपास 10.30 वाजेपर्यंत सुरु होती. या सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य आणि उपराजधानीसाठी अत्यंत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. या याचिकेवर आता 23 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.

दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 900 रुग्ण असताना रेमडेसिवीरचे एकही वायल्स मिळाले नसल्याचं अधिष्ठातांनी कोर्टात सांगितलं. यावर हायकोर्टाने फटकारल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 100 रेमडेसिवीर इंजेक्शन पोहोचवण्यात आले. तसंच ते पोहोचल्याचे अधिष्ठातांकडून हायकोर्टाच्या रजिस्ट्रार यांना कळवण्यात आलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram