Nagpur Heat Wave : नागपुरात 107 दिवस उष्णतेच्या लाटेची नोंद ABP Majha
Continues below advertisement
उन्हाच्या काहीलीनं नागपूरकरांची लाही लाही होत असताना त्यात भर टाकणारी आणखी एक आकडेवारी समोर आलेय. गेल्या ५० वर्षात एकट्या मे महिन्यामध्ये १०० हून अधिक वेळा उष्णतेची लाट पाहिलेलं नागपूर हे राज्यातलं एकमेव शहर ठरलंय..भारतीय हवामान खात्यानं १९६९ ते २०१९ या ५० वर्षांची आकडेवारी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेय. त्यात मे महिन्यात तब्बल १०७ वेळा नागपूरकरांनी उष्णतेची लाट अनुभवल्याचं दिसून येतंय. यात ९० दिवसांसह चंद्रपूर दुसऱ्या स्थानावर तर ८० दिवसांसह यवतमाळ तिसऱ्या स्थानावर आहे. काँक्रीटीकरणामुळे हा उष्णतेच्या लाटेचा फटका बसत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
Continues below advertisement