Nagpur Gondkhairi Coal Mining Case : नागपूरच्या गोंडखैरी कोळसा खाणप्रकरणी आज जनसुनावणी
नागपूर मेट्रो रिझनमध्ये येत असलेल्या गोंडखैरी कोळसा खाणीच्या उत्खननाला परवानगी मिळाली होती. मात्र स्थानिकांचा या प्रकल्पाला कडाडून विरोध झाला. स्थानिकांनी याला विरोध केल्यानंतर आता पर्यावरण नियंत्रण मंडळाने यासंदर्भात आज जनसुनावणी ठेवली आहे, या प्रकल्प क्षेत्रात वेणा जलाशय, राष्ट्रीय महामार्ग, अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्ट्री आणि नागपूर शहरालगतचा निमशहरी भाग येतो. त्यामुळे आज होणाऱ्या जनसुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.