Nagpur Fire | नागपूरच्या वेलट्रीट रुग्णालयाला आग, तीन जणांचा मृत्यू; उशिरा रात्री आगीवर नियंत्रण

Continues below advertisement

नागपुरात वाडी परिसरातील वेलट्रीट रुग्णालयात आज संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. वेलट्रीट रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली. आग लागली त्या वेळेला रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत होते. अनेक जणांना सुरक्षित सुरक्षित बाहेर हलवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram