Nagpur Fire : पत्नीशी भांडणामुळे सिलिंडरमधून घरभर सोडला गॅस

Continues below advertisement

Nagpur Fire : पत्नीशी भांडणामुळे सिलिंडरमधून घरभर सोडला गॅस  रागाच्या भरात माणून काय करून बसतो, याचं एक धक्कादायक उदाहरण नागपूरच्या कोराडीमध्ये घडलंय. पत्नी सोबत झालेल्या वादातून घरातले एलपीजी गॅस सिलेंडर लिक करून कुटुंबाला पेटवून देण्याचा प्रयत्न एका माथेफिरूनं केला. रंजन शाव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो एका सहकारी बँकेत क्लार्क म्हणून कार्यरत आहे. कोराडीच्या ओम नगर भागात शैलपुत्री अपार्टमेंट मध्ये हा प्रकार घडला. रंजन शाव यांच्या पत्नीने समयसूचकता दाखवत नातेवाईक आणि पोलिसांना सूचना दिली.. पोलिसांनीही घटनेचा संभाव्य धोका लक्षात घेत अग्निशमन दलाला लगेच पाचारण केले... पोलिस आणि अग्निशमन दल शैलपुत्री अपार्टमेंट मध्ये शाव यांच्या फ्लॅटच्या दारावर पोहोचल्यानंतरही रंजन शाव दार उघडायला तयार नव्हते. मग पोलिसांनी एक युक्ती केली. रंजनच्या एका मित्राला बोलणं करायला पुढे केलं, आणि त्याच्याशी बोलण्यासाठी जेव्हा रंजननं थोडंसं दार उघडलं तेव्हा बाजूलाच लपलेल्या पोलिसांनी रंजनवर झडप घातली, आणि रंजनला ताब्यात घेतलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram