Nagpur Fake Pistachio : शेंगदाण्यावर हिरवा रंग देऊन पिस्ता म्हणून विक्री
हिवाळ्यात सुकामेवा खास करून पिस्ता खाण्याचा विचार करत असाल, तर जरा सावध रहा... कारण काही भेसळखोर शेंगदाण्यावर हिरवा रंग चढवून बाजारात सुक्या मेव्याचा व्यापार करत असल्याचं समोर आलंय.. नागपुरात काही भेसळखोरांनी ७० रुपये किलोचे शेंगदाणे अकराशे रुपयाला विकण्याचा गोरखधंदा सुरु केलाय.. नागपूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांनी गोळीबार चौकातील कारखान्यावरही कारवाई केलीये.. या कारखान्यात आरोग्यासाठी हानीकारक असलेला रंग शेंगदाण्यासाठी वापरला जात होता.. त्यामुळे कॅन्सरसारखे जीवघेणे रोग होऊ शकतात अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीये.