Nagpur : गोळी चालवण्याच्या सरावादरम्यान परीक्षकाने जवानाला मारहाण
गोळी निशाण्यावर का चालवली नाही.. या रागातून गोळी चालवण्याच्या सरावादरम्यान परीक्षकाने जवानाला मारहाण केलीय.. यामुळे जवानाच्या कानाचे पडदे फाटल्याची घटना नागपुरातील घडलीय..
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या राज्यभरातील 50 सुरक्षारक्षकांसाठी बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण आणि सराव हिंगणामधील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक चारमध्ये आयोजित करण्यात आलेलं.. यावेळी घटना घडलीय. याप्रकरणी आता परीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय..