Nagpur Electricity : पॉवर ट्रान्सफाॅर्मरमधल्या तांत्रिक त्रुटीमुळे नागपुरातील अनेक भागात लोडशेडिंग

Continues below advertisement

महापारेषणच्या १३२ केव्ही क्षमतेच्या बेसा सबस्टेशनमध्ये स्थापित असलेल्या पॉवर ट्रान्सफाॅर्मरमध्ये आलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे दक्षिण नागपुरातील अनेक भागात पुन्हा लोडशेडिंग सुरू झालंय. त्यामुळे पॉवर ट्रान्सफाॅर्मर सुरू होईपर्यंत या परिसरात वीज संकट राहील, असं महावितरणने स्पष्ट केले आहे. रात्री विजेची मागणी दुप्पट असल्याने वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. कंपनीने दोन ते तीन दिवसांत ही समस्या दूर करण्याचा दावा केलंय. तसंच या गैरसोयीबद्दल नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram