Nagpur : शिंदे, फडणवीस हेडगेवारांच्या स्मृतीभवनावर; तर अजितदादांनी दर्शन घेणं टाळलं
संघ कार्यालयाच्या परिसरात जाऊनही अजित पवारांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचं दर्शन घेणं टाळलंय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग मैदानावरील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपताच शेजारीच असलेल्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट दिली.. दोघांनीही हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीस्थळाला भेट देत वंदन केलं.. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनांचे ताफे संघाच्या रेशीमबाग कार्यालयात उभे करण्यात आले होते... त्यामुळे आपल्या वाहनात बसण्यासाठी जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस संघ कार्यालयात पोहोचले, तेव्हा दोघांनी हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला वंदन केले... अजित पवारही त्यांच्या गाडीमध्ये बसण्यासाठी रेशीमबाग येथील संघ कार्यालय परिसरात आले होते... मात्र त्यांनी समाधी स्थळाकडे जाणे टाळले हे विशेष...